सर्वप्रथम हा ब्लोग लिहिण्यासाठी मला प्रव्रुत्त करणारया अनेक ब्लोगर मित्रांचे आभार…..
इथे इतरांना स्वत:ची ओळ्ख करुन देताना स्वत:लाच अनेक प्रश्न विचारले……तर पहिल उत्तर हेच मिळाल जे आपण बहुदा ईन्टरव्ह्युज मधे किंवा मित्रमंडळींना ओळख करुन देताना देतो….तर व्यवसायाने मी एक सोफ़्ट्वेर ईंजिनीयर….मराठमोळी…मुंबईकर मुलगी….
आवडणारया गोष्टींच तोंडभर कौतुक करते आणि चीड येणारया गोष्टींवर सडकून टिका……कधी मोठ्यात मोठ्या घटनेचहि काहि वाटत नाही तर कधी छोटीशी गोष्ट ही मनाला हुरहुर लावुन जाते…..पण विचार चक्र मात्र अखंड सुरु असते…..
एकाच वेळी अनंत विचारांनी ग्रासलेल्या मनाला मोकाळी वाट करुन द्यावी आणि आपल्याच विचारांच मंथन इतरांकडूनही व्हाव म्हणुन हा ब्लोग….कधी कधी खूप बोलावस वाटत पण ऐकून घेणार कुणीच नसत जवळपास…अशावेळी हा ब्लोग म्हणजे वाचकांना आपले विचार सांगण्याची एक संधिच आहे……
इथे मी ते सगळ लिहिणार जे मनात मात्र आपसुकच येते. मग ते काहिही असु शकते………अगदी काहिही…….आणि कितीहि…….ते “थेट दिल से” असेल एवढ मात्र नक्की. तुमच्या प्रतिक्रियांमुळे मलाही कळेल कि मी किती पाण्यात आहे ते. 🙂
नवशिक्या वाहन चालक कसा सिग्नल सुटल्यावर गाडी पुढे नेताना क्लच आणि ब्रेक एकदम सोडतो आणि गाडीला हिसका बसतो…..तस कदाचित होइल माझ…..पण विचार मन्थनाच्या नियमित ड्राईव्ह ने “L” चा बोर्ड लवकरच हटायला काहि हरकत नाहि………….
मस्त तृप्ती..शुभेच्छा पुढच्या ब्लॉग वाटचालीला…
गाडीचा “L” चा नक्की बोर्ड हटेल. मराठी टाइप करायला बराह वापरून बघ..
LikeLike
🙂
LikeLike
अरे मी बाराह वरच टाईप केलय…..motivation साठी आभार
LikeLike
L ची पाटी काढुन मनाची गाडी वाटेल तिथे न्या आणि मांडा अनुभव इथे.. ब्लॉगच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा…
LikeLike
धन्यवाद देवेन्द्र…..गाडीचे गियर्स टाकतेय…बघू किती भरधाव धावते ती…
LikeLike
छान ब्लॉग आहे. आवडला. एकदम ‘दिल से’.!!
LikeLike
HAVE TO READ MORE. just visited your blog. so good luck and let me read before I put any comments.
-Shehzad
LikeLike