• मी कोण ?

थेट दिल से

~ मनापासून

थेट दिल से

Monthly Archives: जुलै 2010

इंडियन अमेरीकन आणि मुंबईकर भैय्ये…

11 रविवार जुलै 2010

Posted by truptisalvi in सामाजिक

≈ 10 प्रतिक्रिया

 दोन दिवसांपुर्वी टाईम्स ओफ इंडीया वाचताना एका बातमीने लक्ष वेधून घेतले. “Time magazine apologises to Indian-Americans for ‘My Own Private India” लगेच पूर्ण बातमी वाचून काढली आणी टाईम मॅगझीन मधे छापून आलेला ‘My Own Private India’ हा लेखही आधाशासारखा वाचला…. जोएल स्टेन या अमेरिकन पत्रकाराने मागील दोन दशकात त्याचे न्यु जर्सी मधील होमटाऊन एडीसन मधे घडून आलेल्या अमुलाग्र बदला बद्दल विनोदी शैलीत लिहिल आहे. त्याच्या मते एकेकाळी अमेरिकन धाटणीत मिरवणा-या एडिसन शहराला त्यातील व्यापक भारतीय लोकसंख्येने आणि त्यांच्या राहाणीमानाने अवकळा आली आहे. तेथील पिझ्झा हटची जागा आता भारतीय, अव्यवस्थित छपराच्या स्वीट मार्ट्सनी, ईटालीयन रेस्टॉरंट्सची जागा मोघलाई हॉटेल्सनी घेतली तर तेथील मल्टीप्लेक्स मधील हॉलीवूड मूवीजची जागा बॉलीवूड सिनेमांनी, स्नॅक्समधील खादद्याची जागा समोस्यांनी घेतली. 🙂 हे वाचताना थोड हसू आल पण लेखक हे उपरोधाने न्हवे तर उपहासाने म्हणतोय हे लक्षात आल्यावर थोडा रागही आला.

जोएल स्टेनच्या या लेखातील बरीचशी वाक्य मला खटकली…खटकली म्हणण्यापेक्षा लागली…का ते माहीत नाही पण अंतर्मुख होउन विचार केल्यावर संभ्रम वाढला की मला खरच एवढा राग कसला आला आणि का???? तुम्ही वाचा…थोडा विचार करा आणि मग ठरवा…

 उदाहरणार्थ: For a while, we assumed all Indians were geniuses. Then, in the 1980s, the doctors and engineers brought over their merchant cousins, and we were no longer so sure about the genius thing. In the 1990s, the not-as-brilliant merchants brought their even-less-bright cousins,and we started to understand why India is so damn poor. (राग आला)

Eventually, there were enough Indians in Edison to change the culture. At which point my townsfolk started calling the new Edisonians “dot heads.” One kid I knew in high school drove down an Indian-dense street yelling for its residents to “go home to India.” In retrospect, I question just how good our schools were if “dot heads” was the best racist insult we could come up with for a group of people whose gods have multiple arms and an elephant nose. (जरा अजून वाढला)

 But if you look at the current Facebook photos of students at my old high school, J.P. Stevens, which would be very creepy of you, you’ll see that, while the population seems at least half Indian, a lot of them look like the Italian Guidos I grew up with in the 1980s: gold chains, gelled hair, unbuttoned shirts. In fact, they are called Guindians. Their assimilation is so wonderfully American that if the Statue of Liberty could shed a tear, she would. Because of the amount of cologne they wear. (अजून जास्त)

हो जवळ जवळ अर्धा लेख मे या पोस्ट्मधेच टाकलाय कारण हा केवळ ईमिग्रेशन (स्थलांतर) वर आधारीत लेख नसून सरळ सरळ अमेरिकेत वास्तव्य करणा-या भारतीयांना टारगेट केल गेल आहे आणि कदाचित त्याच उद्देशाने लेख लिहिला गेला आहे असे प्रथमदर्शनी तरी जाणवते. भारतीयांच्या एडिसन अथवा तत्सम अमेरिकेतील शहरातील वास्तव्याला “अतिक्रमणाचे” रूप दिले गेले आहे.

 पूर्ण लेख वाचण्यासाठी हा दुवा पहा:  http://www.time.com/time/magazine/article/0,9171,1999416,00.html#ixzz0szfV3krA

 या लेखावर अमेरिकेतील अनेक भारतीयांनी आक्षेप घेऊन टाईम मॅगझीन आणि पत्रकार जोएल स्टेन यांच्या विरोधात एक ओनलाईन पेटिशन फाईल केले आहे ज्यात दोघांनीही माफी मागावी तसेच टाईम आणि सी.एन.एन. यांनी ह्या लेखाचे ओनलाईन प्रकाशन रद्द करावे अशी मागणी केली आहे. टाईम मॅगझीन आणि जोएल यांनी माफी तर मागितली आहे पण लेख अजूनही ओनलाईन झळकत आहे. असो जोएल स्टेनने माफिनाम्यात कुणालाही दुखावण्याच्या हेतूने हा लेख लिहिला नसल्याचे नमूद केले आहे या उलट इमिग्रेशन नेहमीच प्रगती किंवा समृद्धी आणत नसून तेथील मूळ रहीवाश्यांसाठी डिसकंफ़र्ट (असुविधा) सुद्धा आणू शकते असे म्ह्टले आहे.

आणि एकाएकी प्रकाश पडावा तसा मेंदूत एक बल्ब पेटला.. स्थलांतत–> रहाणीमान आणि संस्कृती बदल–>स्थानिक रहीवाश्यांच्या समस्या आणि असुविधा–> अतिक्रमण–> वाद, तक्रार, द्वेष…. ही साखळी डोक्यात पिंगा घालू लागली.

या लेखकाचा इतका राग येण्याचे काय कारण? आम्ही काय वेगळ करतो?? यू.पी, बिहार मधून आलेल्या सो कॉल्ड लोंढ्यांनी मुंबईची संस्कृती बिघडवली आणि इथे अतिक्रमण केल असा आरोप आम्हीही करतोच की. आमच्यात तर रंगभेद हेही कारण नाही तरी आमच्याच देशातल्या लोकांशी याच मुद्द्यावरून भांडतो. त्यांना देहाती, भैय्ये वगैरे म्हणतो मग या गो-यांनी आम्हाला “dot heads” म्हटल तर त्यांच चुकतय अस आम्ही का म्हणायच?? तुमच्या राज्यात जाऊन करा ना तुमचे उद्योग…इथे कशाला? अस आम्ही म्हणतो तर त्यांनी “go home to India.” अस आम्हाला म्हटल्यावर आम्हाला का राग यावा? तुम्ही म्हणाल अमेरीकन एम्बसीने आम्हाला इथे राहाण्याचा परवाना दिलाय मग हे गोरे आम्हाला बोलणारे कोण? अहो मग भारतीय संविधानाने देशात कुणीही कुठेही रहावे असे म्हटलेच आहे की…

आपल्या प्रदेशात बाहेरील लोकांनी येऊन वास्तव्य केल्यावर, तेथील उपलब्धींचा फायदा घेऊन स्वत:ची उन्नती केल्यावर एक असुरक्षिततेची भावना तेथिल मूळ लोकांच्या मनात दृढ व्हायला लागते आणि त्यातून निर्माण होतो द्वेष. आणि मग यात तुम्ही स्वत:हाचाच हेका धरून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू लागलात तर ते आगीत तेलाचे काम करते. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधे झालेले भारतीयांवरील हल्ले हे याचेच एक उदाहरण असू शकते. अर्थात अशा हल्ल्यांना किंवा मॅगझीन मधून केल्या गेलेल्या अशा जाहीर टिकेला माझा पाठिंबा नाही पण ह्या गोष्टी आपल्याच आजूबाजूला घडत असताना आणि कुठेतरी आपणही त्यात सहभागी असताना त्यांनी अस केल म्हणून फार अचाट व्हायची गरज नाही. अमेरिकेत काय किंवा भारतात काय हा मुद्दा आणि याचे पडसाद सारखेच…फक्त भूमिका बदललेल्या आहेत.

 एक साधा हिशोब आहे जिथे जास्त संधी, उपलब्धी, समृद्धी तिथे त्यांचा फायदा घेण्यासाठी लोक स्थलांतर करतात…आपणही फ़ॉरेक्स मधे पैसा कमवायचा म्हणून परदेशी जातोच की आणि आपल्या मुलांनाही आवर्जून धाडतो…आजकाल तर हा एक स्टेटस सिंबोल झालाय… असो हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन…. मग आपला तो बाळ्या आणि दुस-याचे ते कार्टे हा न्याय कुठला? स्थलांतर करून रहात असलेल्या प्रदेशातील संस्कृती जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने बदलणे आणि तेथिल सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे हे केव्हाही वाईटच आणि टिकेस पात्रच….मग ते अमेरीकेतील भारतीय असोत वा मुंबईतील भैय्ये….. “देश तसा वेष” हे उगीचच नाही म्हटलेलं……

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

Follow थेट दिल से on WordPress.com

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 473 other followers

अलीकडील पोस्ट

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही…
  • तुझी नी माझी प्रीत सख्या…
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

Top Posts & Pages

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही...
  • तुझी नी माझी प्रीत सख्या...
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

आर्चिव्ह्ज

  • डिसेंबर 2016 (1)
  • नोव्हेंबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2015 (1)
  • मार्च 2012 (1)
  • फेब्रुवारी 2012 (1)
  • ऑक्टोबर 2011 (1)
  • फेब्रुवारी 2011 (1)
  • जानेवारी 2011 (1)
  • नोव्हेंबर 2010 (3)
  • जुलै 2010 (1)
  • जून 2010 (2)
  • मे 2010 (3)
  • एप्रिल 2010 (1)
  • मार्च 2010 (2)
  • फेब्रुवारी 2010 (1)

प्रवर्ग

  • आपले सण
  • उपहास
  • कवितेचा कुंचला
  • येता-जाता
  • लघुकथा
  • सामाजिक
  • Uncategorized

Blog Stats

  • 23,932 hits

“मराठी ब्लॉग विश्व”

Create a free website or blog at WordPress.com.

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Follow Following
    • थेट दिल से
    • Join 473 other followers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • थेट दिल से
    • सानुकूल करा
    • Follow Following
    • Sign up
    • लॉग ईन
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
loading रद्द करा
Post was not sent - check your email addresses!
Email check failed, please try again
Sorry, your blog cannot share posts by email.
%d bloggers like this: