नाही या पोस्ट मधे कुठलीही प्रेम कथा लिहिलेली नाही.

परवा ऑटो मधून घरी येत असताना या नावाने आणि त्या खालच्या मजकुराने माझी नजर रिक्षा ड्राइवर च्या सीट च्या मागे लावलेल्या पोस्टरने  खिळवून ठेवली. मला हसू आवरले नाही. पण मी एकटीच रिक्षात असल्याने ड्राइवर वेडी समजून मला खाली उतरवेल या भीतीने मी मनातल्या मनातच खदखदून हसले (हे मी समस्त रिक्षावाल्यांची माफी मागून लिहितेपण हसू आवरल नाही मला)

त्या पोस्टरचा लगेच फोटो काढावासा वाटला. पण रात्र असल्याने आणि माझ्या मोबाइल च्या कॅमे-याला फ्लॅश नसल्याने फोटो निटसा आला नाही. तरीही अपलोड करते.

 
 खर तर नवीन वर्षाचा संकल्प केला होता शक्यतो रिक्षाने प्रवास करणार नाही पण माझा हा संकल्प दोन दिवासांपेक्षा जास्त नाही टिकला. 🙂 मुंबईत राहून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने रिक्षाने प्रवास करण टाळणे म्हणजे थोडे कठीणच…

आपल्याला कुठेतरी जायला उशीर झालाय आणि अशा वेळिस तातडीने रिक्षा मिळणे आवश्यक असते तेव्हाचएकतर रिक्षा मिळत नाही(यालाही बरीच कारण असू शकतात ती पुढे सविस्तर मांडते) किंवा मिळालीच तर रिक्षावाला तुम्हाला तिकडे नेण्यासाठी नकार देतो (यालाही बरीच करणे असू शकतात 🙂 ) तेव्हा आपला ज्वरबिंदू किती उच्च होत असेल याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकालाच असते रिक्षा (वाले) आणि पॅसेंजर्स याबाबतीत आढळणारे काही कॉँमन प्रसंग….

तुम्ही रिक्षाची वाट बघत उभे आहात. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक रिक्षा मधे डोकावून ती रिकामी आहे की नाही याची शहानिशा करताय. अशा वेळी

 1) एक रिक्षा थांबते. रिक्षावाला मानेनेच किधरअशी खूण करतो.
  
तुम्ही : अमुक अमुक जगह चालना है (आणि वाकून एक पाय रिक्षात टाकता)
 

रिक्षावला : उधर नही जाएगा (आणि लगेच अ‍ॅक्सेलरेटर वाढवतो)

तुम्ही : *#@#**$$

 2) एक रिक्षा तुम्हाला बघून तिचा वेग कमी करते. तुमच्या दिशेने येऊ लागते.

 तुम्ही(मनाशी) : हूश्श चला मिळाली नाहीतर उशिरच झाला असता. तुम्ही असे बोलून देवाचे आभार मानतच असता इतक्यात रिक्षावला तुमच्या थोडस पुढेच उभ्या असलेल्या सुंदर तरुणीच्या पुढयात रिक्षा थांबवतो. ती त्यात बसते आणि तुम्ही मात्र ती रिक्षा डोळ्याआड होईपर्यंत तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत राहता
  
तुम्ही : *#@#**$$

3) एक रिक्षा येते आणि तुमच्या पुढयात थांबते.  

रिक्षावला: (गुटखा चघळत तुमच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात)किधर जानेका?”

 तुम्ही : अमुक अमुक वेस्ट

रिक्षावला: (दोन मिनिट विचार करत आणि गुटखा रवंथ करत) “हम्म” (म्हणजे बैठो)

 अर्ध्या रस्त्यात

रिक्षावला: साहब गॅस खतम हो गया है उतरो

तुम्ही : अरे ऐसे कैसे खतम हो गया. अभी तो आधा रस्ता भी नही आए.

रिक्षावला: साहब ये कोई मोबाइल का टॉकटाईम है जो चेक करूगॅस है खतम हो रहा है.

तुम्ही : अब मुझे यहा ऐसी जगह पे दुसरी रिक्षा भी नही मिलेगी

(रिक्षावल्याच्या गालतली खळी बघून तुमच्या डोक्याची शीर चढते तुम्ही मु्काट पैसे देऊन दुसरीच्या शोधात वण वण करता)

तुम्ही: *#@#**$$

 इत्यादी इत्यादी. मुद्दाम दुस-या पात्राचा उल्लेख मी पुरु्षार्थी केलाय कारण मुलींना हे अनुभव कमी येतात.  (पण मुलींनादेखील कधी कधी काही वात्रट रिक्षावाल्यांचा त्रास सहन करावा लागतो स्पेशली त्या सगळ्यात जास्त इरिटेट होत असतात त्या रिक्षावाल्यांच्या डोक्यावर लावलेल्या स्पेशली अड्जेस्टेडलांबट आयताकृती आरशांना)
  
जशी हाताची सगळीच बोट सारखी नसतात तसे सगळेच रिक्षावाले काही वर उल्लेख केल्याप्रमाणे नसतातकाही सभ्य, वाहतुकीचे नियम पाळणारे, सर्व पॅसेंजर्स ना समान वागणूक देणारेही आहेत. आणि त्यांचेही चांगले अनुभव आपल्याला येत असतात
 
 
जेव्हा तो अनाम प्रेमचा पोस्टर मी रिक्षा च्या मागे वाचला तेव्हा घरी येऊन गूगल केले की हे अनाम प्रेमकाय प्रकरण आहे? कुठली संस्था आहे की दुसर काहीतरी? तेव्हा मला मुंबई मिरर मधला हा लेख दिसला.

http://www.mumbaimirror.com/index.aspx?age=article&sectid=2&contentid=20100129201001290304295763ecbd1c2

 या लिंक मधे लिहिलेली हिंदीमधली त्रिसूत्री मराठीत अतिरंजित करून भाषांतरीत केली गेली आहे.
त्यात रिक्षावाल्यांच्याही काही जेन्यूईन अडचणी असतात भाड न घेण्यामागे असा एका ड्राइवर ने संगितलय जशा
 
1)रिक्षा मधे इंधन कमी असणे

2)लंच अवर्स 

3)पॅसेंजर ला जिथे जायचय तिथे पार्किंग साठी सुविधा नसणे इत्यादी.

पण अशी कारणं नसतानाही कित्येकदा ते सरळ सरळ नकार देऊन निघून जातात. बर सगळेच पॅसेंजर त्यांना आदरार्थी वागणूक देत असतील अस मला म्हणायच नाही. हो पण रिक्षा वाल्याने जर योग्य ठिकाणी व्यवस्थित नेऊन सोडल तर त्याला नुसत “थॅक्स” म्हणायला आपल काहीच जात नाही. मी स्वतः तस म्हणते (ते पोस्टर पाहायच्या आधी पासून) (प्रोवाइडेड तो रिक्षावला सभ्य वाटला तरच) अगदी बस मधल्या कंडक्टरलाही. तुम्ही म्हणाल थॅक्स कशाला म्हणायला हव ते त्यांच कामच आहे पण दिवसभर अशी वण वण करणार्‍या कंडक्टर किंवा रिक्षावाल्याला थॅक्स म्हटल तर बिघडल तरी कुठे. एक प्रकारच सौजन्य दाखवायच बस…

 पण या अनाम प्रेम संस्थेचे जे कुणी अनुयायी असतील त्यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी रिक्षा चालकांसाठी ही अस एखाद पोस्टर बनवाव….ज्यात रिक्षा चालकांनी काय कराव आणि काय करू नये याचे उपदेश त्यांनाही द्यावेत. टाळी एका हाताने वाजत नसते.