जीवाची तगमग, घशाला कोरड
अंगाची होतेय लाही लाही
वाट पाहून शिणलोय आता,
शिशिरा कृपा केव्हारे होई?
आद्रही आहे आणि उष्णही,
कोरड ही आहे आणि घामही
वर्षा गेली शरदही सरला
तरी ग्रीष्माची मिठी काही सुटत नाही
काम नाही हे पन्ख्याचे
नाही गार पाण्याचे
सार्यांनीच हात टेकले यापुढे
जरी युग असले हे यंत्रांचे
वरुन सूर्य ओततोय आग
खाली आहे प्रदुषण
मुंबई आता त्रस्त झालीय
देईल तरी कुणाला दुषण?
वाट पाहतोय शिशीरागमनाची
झालोय आम्ही आता चातक
बन्डीची थंडी नको रे बाबा
मुंबईची अपेक्षा अगदीच माफक
दिवाळी आता तोन्डावर आलीय
सणाचा उत्साह वाढू दे जरा
गुलाबी थंडीने घेऊदे कुशीत
रोशणाईने उजळूदे आसमन्त सारा…