टॅगस्
घड्याळाचा गजर म्हणतो पहाट झाली उठा
जांभई देऊन शरीर म्हणत अजून झोप जरा
जिमची बॅग , योगाची मॅट सगळ वाट पाही
अंगातला आळस मात्र काही जाऊ पाहत नाही
रनिंगचे शूज खूणावून म्हणतात धाऊन बघ जरा
मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला
उठल्या उठल्या ब्रश आधी मोबाइल पडे हाती
मेसेज, मेल्स, व्हाट्सअप यांच्या खचात बुडलो आम्ही
पलन्गावरची चादर म्हणे घडी घाल माझी
मान फिरवून मी तरीही स्क्रीन स्क्रोल करी
खिडकी आडून सूर्य म्हणे खाली उतर जरा
मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला
अचानक घड्याळ पाहीले की बोबडी आमची वळते
मोबाईल च्या नादात वेळेच गणित अगदी कसे चुकते
घाई घाईत रोजच निघताना काहीतरी हुकते
नऊ पाच ची लोकल आमची सातत्त्याने मुकते
किचनमधला स्वयंपाक म्हणतो खाऊन घे जरा
मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला
ऑफीस मधे कामाचा खूप भार होतो
त्याचा शीण जावा म्हणून सुट्टा ब्रेक घेतो
नाकातून धूर सोडत देशाच्या व्यथा गातो आम्ही
डोक्यात राग, वाणीत आग अन् सिगरेट पायाखाली
जिन्याच्या पाया-या म्हणी आम्हाला चढून बघ जरा
मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला
कॉफी , स्मोक , पिझ्झा शिवाय पान हलत नाही
पोळी भाजीचा डबा माझी वाट पाहत राही
अपचन , जळजळ यांची आता सवयच झालीय मला
शूगर, कोलेस्ट्रोल वाढले कसे कारण काही कळेना
पॅंट्री मधली ग्रीन टी म्हणे पिऊन बघ जरा
मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला
थकून घरी आलो की TV च्या समोर बसतो
स्ट्रेस जावा म्हणून पुन्हा स्ट्रेस्सफूल गोष्टीच बघतो
यंत्रयुगाने पछाडल आणि शरीर झाले स्थूल
व्याधी काही जडल्या तर त्यांच सापडेना मूळ
रात्रीच जेवण म्हणत अरे वेळेत खा मला
मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला
आप्तेष्टान्शी संवाद आता कधी कधीच घडतो
फेसबूकच्या पोस्ट वरून त्यांचा स्टेटस मात्र कळतो
मैदानी खेळ, मित्रांचा कट्टा हे सारे विस्मरणात गेले
मूवीस, रेस्टोरेंट्स, पब्ज यांनी खिशात भोक केले
मित्रांचा जुना फोटो म्हणतो भेटून ये जरा
मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला