• मी कोण ?

थेट दिल से

~ मनापासून

थेट दिल से

Monthly Archives: मार्च 2010

कांदे पोहे

10 बुधवार मार्च 2010

Posted by truptisalvi in येता-जाता

≈ 16 प्रतिक्रिया

आपल्याकडे कांदे पोह्याचा कार्यक्रम म्हटला की “यन्दा कर्तव्य आहे” हे सहज लक्षात येते…पण हया कार्यक्रमाच्या प्रसंगी कांदे पोहेच का करतात हे मला अजुनही उमगत न्हवत. नाही म्हणजे हल्ली क्रिमची बिस्किटे आणि चिवडयाने पण काम चालून जाते…हल्ली आपला कल रेडीमेड आणि इन्स्टंट गोष्टींकडेच जास्त असतो आणि त्यातून अमूक अमूक गोष्ट आमच्या छकु ने केलीय हो..अस म्हणणं सुद्धा ६० च्या दशकाच्या क्रुष्ण धवल चित्रपटातल्या आईने म्हटल्यासारख वाटत…आणि त्याहूनही व्यवहारीक गोष्ट ही असू शकते की आज काल मुला–मुलींच्या अपेक्षांचा दर्जा आणि दायरा एवढा रुंदावलाय की त्यामुळे एक दोन कार्यक्रमांमधेच स्थळ निश्चित होइलच याची शाश्वती नाही…तेव्हा किती वेळा कांदे पोहे बनवणार हो? 😉

पण तरीही अजूनही स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला सर्रास कांदे पोहेच बनवले जातात..मग कांदे पोहेच का बर या विषयावर मन घुटमळायला लागल. त्यामागे काहितरी कारण असणारच यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण परंपरेने चालत आलेल्या बरयाच गोष्टींमागे काहितरी विचार हा असतोच बरेचदा आपल्या मोठ्ठ्यांना ते कारण ठाउक नसतं तरीहि ते त्यांच अंधानुकरण करतात आणि आपल्यालाही करायला सांगतात म्हणून आपल्याला त्या निरर्थक वाटतात….

तर सांगायचा भाग हा की हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने पोह्यांची रेसिपी माझ्या नजरेसमोरून सरकायला लागली…आणि त्याचा मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाशी काय बर संबंध असावा यावर माझी विचार चक्र सुरू झाली. आणि मला जाणवलं की कांदे पोह्याच्या ह्या पाक क्रुतीमधे स्वादातले जवळपास सगळे रस अंतर्भूत झालेले असतात….

भिजवलेल्या पोह्यांचा नरमपणा, भाजलेल्या शेंगदाण्यांचा खुसखुशीतपणा, लिंबाचा किंचितसा आंबटपणा आणि थोड्याशा साखरेचा गोडवा, हिरव्या मिरचीचा तिखटपणा, कांद्याने आणि राई जिरयाच्या फोडणीने आलेली चव आणि वरून पेरलेल्या कोथिंबिरीची मेहक…..इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याची तितकीच वेगवेगळी चव….पण तोंडात पडले की सगळ कस एकजीव आणि चवदार…..लग्नानंतरच आयुष्य ही मुला–मुलीने असच एकजीव होऊन चवदार बनवाव असा त्यामागचा उद्देश असेल का?

करकरीत सुकवलेले जाडे पोहे कढईत टाकण्यापुर्वी पाण्यात भिजवुन नरम करतात तसच संसारात पडताना आपले ईगो, स्वभावातला ताठरपणा सगळ कस भिजवून दूसरया गोष्टी शोषून घेण्यासाठी ओलावा धरायला हवा. तापलेल्या तेलावर जशी राई–जीर आणि मिरची ची फ़ोडणी होते, राई तडतडते, कढईतून बाहेर ऊडू पाहते, मिरची चुरचुरते, फोडणीला तिखट करते, तिच्या तिखट वाफ़ा येतात…मग आपण त्यात बारिक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे टाकतो आणि सर्व चुरचुराट शांत होतो….अगदी तशीच संसारात भांड्याला भांडी लागतात, कधी कधी घरातले वातावरणही तापते, वाद होतात, चीड चीड होते, नात्यांमधे तिखटपणा येतो.पण हे सारं क्षणिकच असाव ह्या फोडणीप्रमाणे. ती करपायच्या आधीच त्यात जसा कांदा टाकतात तसच वाद विकोपाला जाण्याआधी नात्यांमधे प्रेमाचा आणी समजुतदारपणाचा थंडावा यायला हवा…..

कांद्याचा कच्चेपणा जाइपर्यंत, तो गुलाबी होईपर्यंत आपण जस त्याला मंद आचेवर शिजवतो तसचं हळू हळू आपल्या प्रेमाला संसारात मुरू द्याव लागत…हळू हळू तुमच्यातला तिखटपणा कमी करून स्वभावाला सहनशीलतेच वंगण घालायला हव..कच्चे शेंगदाणे जसे तेलावर परतून खुसखुशीत होतात तसेच एकमेकांबद्द्ल असलेले समज गैरसमज दूर करुन संसारच्या मंदाग्नीवर नातं परिपक्व व्हायला हव मग सहजीवनात तसाच खुसखुशीतपणा येतो… .

 हळद आणि साखर आपल्याच रंगात आणिक स्वादात सर्व पदार्थांना सामावून घेतात….ही उपमा मला मुलीला द्यावीशी वाटते. मुलीला आपल्या गोड आणि प्रसंगी खंबीर स्वभावाने तिच्या संसारातल्या सर्व घटकांमधे सामावून घेता आलं पाहीजे. स्वादानुसार मीठ म्हणजेच संसाराला रंगत यावी एवढ्याच कानपिचक्या आणि खोड्या…..नाहीतर रेसीपी खारट होईल हा!!!!!!!! 😉 भीजलेले पोहे जसे कढईत पडून वरील सगळे रस पिऊन घेतात, हळदीच्या रंगात एकजीव होतात तसचं एकमेकांच्या उणीवा, चांगुलपणा, गुणदोष सगळच पिऊन घेण्यासाठी आणि एकमेकांच्या रंगात रंगून जाण्यासाठी जोडप्याने स्वत:मधे एक आद्रता जपली पाहीजे…. पोह्यांवर लिंबू पिळून सर्व मिश्रणाला जशी वाफ़ काढतो, वरून चिरलेल्या कोथिंबीरिची आणि ओल्या नारळाच्या किसाने सजावट करतो तसच छोट्या छोट्या आनंदाच्या, रुसव्या फ़ुगव्याच्या, आंबट तिखट क्षणांनी संसार खुलवायला हवा..मग संसाराच्या गरमागरम कांदे पोह्याची चव जीभेवर कायम रेंगाळत राहील….

मला माहीत नाही लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमामधे कांदे पोह्याचा काय रोल आहे…पण माझ्या बुद्बीला पटेल सुचेल तस मी त्याचा अर्थ लावला…त्याचा योग्य अर्थ कुणास ठाऊक असेल तर जरूर कळवा. हा लेख लिहीता लिहीता सनई चौघडे या चित्रपटामधील गाण ओठावर आलं आणि म्हणून पटकन गूगल सर्च मारून त्याचे lyrics मिळवले…..

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फ़ोडणी,

हळदीसाठी आसुललेले हळवे मन आणि कांती

आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे…..

नात्यांच्या ह्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी,

आणि म्हणे तो वरचा जुळवी शतजन्मांच्या गाठी,

रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी,

पाने मिटुनी लाजाळूपरी पुन्हा उघडण्यासाठी

 आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे…

दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना,

कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानीमनी नसताना

नकळत आपण हरवून जावे स्वतास मग जपताना,

अन मग डोळे उघडावे ही दिवा स्वप्न पाहताना

आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे……..

 भातुकलीच्या धुवुन अक्षता तांदुळ केले ज्यांनी,

आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी

भविष्य आता रंगविण्याचा अट्टाहासही त्यांचा,

हातावरच्या मेहेंदीवर ओतून लिंबाचे पाणी

आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे………..

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

लेखन एक दर्पण….

05 शुक्रवार मार्च 2010

Posted by truptisalvi in येता-जाता

≈ 8 प्रतिक्रिया

मला शाळेत असताना वाटायच खुप मोठ्ठे विचारवंत किंवा मग युगप्रवर्तक किंवा साहित्याचे अभ्यासकच लिखाण करु शकतात अथवा फ़क्त त्यांनीच लिहाव आणि त्यांनी लिहिलेलच वाचल जाव….
शाळेत मला भाषा विषय खुप आवडायचे….म्हणजे मराठी, ईंग्रजी आणि संस्क्रुत…..हे तास आले की मला खुप refreshing वाटायच. कारण कदाचित त्यातील पाठ, कथा, कविता कुठेतरी घर करायचे मनात…..I used to wonder की कस काय बुआ इतक प्रभावी लिहु शकतात ही माणस…
मग जेव्हा अभ्यास म्हणुन आम्हाला निबंध लिहायला सांगितला जायचा तेव्हा माझा अट्टाहासही हाच असायचा की माझा निबंध हा सगळ्यात उत्तम झाला पाहिजे. म्हणुन जमतील तितक्या म्हणी, चारोळ्या, कवितांच्या ओळी, अलंकारीक शब्दांची रेलचेल करून मी माझ्या निबंधाला सजवायचे….एखादी डीश गार्नीश करावी तसेच……. आणि त्यासाठी माझ कौतुक ही व्हायच…..त्यातुन लिखाणची आवड निर्माण झाली…………
आठवीत असताना माझ्या मैत्रीणींनी वाढदिवसाला मला एक कुलुप आणि किल्ली असलेली डायरी गिफ़्ट केली….झाल…माझ्या लिखाणाला माझी अशी private space मिळाली…ती सिक्रेट डायरी होती म्हणुन त्यात आपल्या मनातल्या सिक्रेट भावनाच लिहायच्या असा माझा समज झाला.
आणि मग मी मनाला एक वाट करुन दिली. माझी आवडती मैत्रीण, माझ्या आत्येबहिणीच लग्न….तिला सासरी जाताना काय विचार येत असतील ते….पहाटे ४.३० ला अर्ध्या झोपेतुन उठुन आमच्यासाठी डबे तयार करणारी आणि मग घाईघाईत ओफ़िसला जाणारी माझी आई, पप्पांनी नाशिकला घेतलेले वीकएंड हाऊस, कोवळ्या शहाळयातल्या मलई प्रमाणे असाणारे माझे वडील,माझ्यावर प्रभाव टाकणारी पुस्तके, माझे प्रेरणास्त्रोत, Bombay Talent Search चे क्लासेस, माझ्या मैत्रिणींचा ग्रुप…..अशा अनेक विषयांची वर्णी त्यात लागली. सगळ काहि शब्दात बंधिस्त करण्याचा अट्टाहासच होता तो…..
डायरी ला मात्र न चुकता कुलुप लावुन मी किल्ली लपवुन ठेवायचे…..थोड्या दिवसांनी माझ्याच लक्षात आले की ते कुलुप हेयरपीन ने सुद्धा उघडते… :)….no worries मी डायरी पण दडवून ठेवायचे….माझे विचार कुणाला कळु नये असच मला वाटायच. आता जेव्हा ती डायरी वाचते तेव्हा हसू पण येत आणि सगळ्या जुन्या आठवणी ताज्या पण होतात.
तर सांगायचा मुद्दा हा की शाळेतील निबंध, वक्त्रुत्व स्पर्धा आणि ही secret डायरी या गोष्टी माझ्या लिखाणाच्या प्रेरणास्त्रोत ठरल्या. मी ज्या वेळेस खुप जास्त दु:खी किंवा खुप जास्त आनंदी असायचे तेव्हा या डायरीची पाने भरायची..आणि मग actually मला खुप हलक वाटायच…
शाळेनंतर ज्युनिअर कोलेजला असेपर्यंत माझ लिखाण चालु होत पण मग नंतर बारावीचा अभ्यास , रीझल्ट्स, एडमिशन ची धावपळ आणि सरतेशेवटी ईंजिनियरींग यात लेखणी थोडीशी दुरावली..computers च्या keys मुळे पेन हाती घेण्याची सवयच मोडली….
मग हल्लीच वाचनात काही ब्लोग्स आले…..एका ब्लोग वरुन दुसरयावर…आणि काही ब्लोगर्स माझे favourite झाले….रोज मी त्यांनी काहि पोस्ट टाकली आहे की नाही ते पाहू लागले….हे ब्लोगर्स म्हणजे कोणी मोठे तत्ववेत्ते अथवा लेखक न्हवेत…तुमच्या आमच्या सारखेच…बर लिखाणाचे विषयही सगळेच काही intellectual किंवा वान्ग्मयाशी संबंधित नाहित आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला येणारे अनुभव, आवडलेल्या, खटकलेल्या गोष्टी, अगदी आंतरस्तरीय राजकारणापासून ते काल रात्री जेवणातली भाजी कशी झाली होती इथपर्यंत विषयांची रुंदी व्यापक असल्याच आढळल…काहीही लिहा..जे तुम्हाला आवडेल रुचेल ते….वाचणरयांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.
एखाद्या ब्लोगर चे काही पोस्ट वाचुन झाले की साधारण मी कल्पना करायला लागायचे की हा माणूस असा असला पाहिजे…..म्हणजे मी दिसण्याबद्दल नाही बोलत आहे पण त्याची विचारशक्ति, द्रुष्टीकोन..या गोष्टी सहज लक्षात येतात…… म्हणजे ब्लोग वर म्हणा किंवा इतर कुठेही तुम्ही जे लिखाण करता त्यातून तुम्ही कुठेतरी स्वत:ला वाचकांपुढे मांडत असता….तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज वाचक तुमच्या नकळत त्यांच्या मनाशी बांधत असतात……
म्हणजे आपले हे लेख आपली प्रतिमा बनतात न्हवे का ?
काहि ब्लोगर मित्रांनी (मित्र एवढ्यासाठी म्हटल कारण मी त्यांना भेटायला रोज त्यांच्या ब्लोग्स वर जाते… जरी ते मला ओळखत नसले तरी) मलाही पुन्हा लिहायला प्रव्रूत्त केलय.
तस ब्लोग वगैरे लिहिण्याइतपत मी काही नियमित लिहित नाही. म्हणून ठरवल होत की किमान नियमित लिखाणाची सवय होइपर्यंत तरी ब्लोग काढायचा नाही. एकदा का लेखणी हातात रुळली कि मग “श्री गणेशा” करायला हरकत नाही. पण आता विचार केला…शुभस्य शीघ्रम…..
हे एक व्यासपीठ असू शकते आपल्या विचारांना ईतरांपुढे मांडण्यासाठी…ईतरांनी वाचल आणी प्रतिक्रिया दिल्याच तर आपल्याला आपल्या विचारांची खोली किंवा मग उथळपणाही मोजता येउ शकेल…आपण विचार करत असलेल्या नाण्याला दुसरी बाजूही असू शकते हे आपले जाग्रुक वाचक मित्र आपल्याला सांगू शकतात….यातूनही कदाचित आपल्या विचारांची दिशा ठरू शकते किंवा रुळलेली दिशा बदलुही शकते….
मला वाटतं आपल लिखाण हे आपल्या व्यक्तिमत्वाच, विचारधारांच प्रतिबिंब असते….त्याला पडताळून बघण्यासाठी लिखाणाचा व्यायाम उत्तम……

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

Follow थेट दिल से on WordPress.com

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 473 other subscribers

अलीकडील पोस्ट

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही…
  • तुझी नी माझी प्रीत सख्या…
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

Top Posts & Pages

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही...
  • तुझी नी माझी प्रीत सख्या...
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

आर्चिव्ह्ज

  • डिसेंबर 2016 (1)
  • नोव्हेंबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2015 (1)
  • मार्च 2012 (1)
  • फेब्रुवारी 2012 (1)
  • ऑक्टोबर 2011 (1)
  • फेब्रुवारी 2011 (1)
  • जानेवारी 2011 (1)
  • नोव्हेंबर 2010 (3)
  • जुलै 2010 (1)
  • जून 2010 (2)
  • मे 2010 (3)
  • एप्रिल 2010 (1)
  • मार्च 2010 (2)
  • फेब्रुवारी 2010 (1)

प्रवर्ग

  • आपले सण
  • उपहास
  • कवितेचा कुंचला
  • येता-जाता
  • लघुकथा
  • सामाजिक
  • Uncategorized

Blog Stats

  • 24,072 hits

“मराठी ब्लॉग विश्व”

Blog at WordPress.com.

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Follow Following
    • थेट दिल से
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • थेट दिल से
    • सानुकूल करा
    • Follow Following
    • Sign up
    • लॉग ईन
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
%d bloggers like this: